रिधोरा ग्रामपंचायत

नागरिकांच्या सुविधेसाठी आमच्याकडे विविध सेवा उपलब्ध आहेत. सर्व सेवा पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने प्रदान केल्या जातात.

ग्रामपंचायत गावातील नागरिकांना उत्तम सेवा प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही पारदर्शकता, जबाबदारी आणि ग्रामीण विकासासाठी प्रयत्नशील आहोत.

अधिकारी आणि कर्मचारी

ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे पदाधिकारी आणि त्यांची संपर्क माहिती

लोकनियुक्त सरपंच

श्री. वैभव जानरावजी राऊत

उपसरपंच

श्री. संदीप धनराजजी कोठे

ग्रामपंचायत अधिकारी

श्री.देवेंद्र कृष्णराव उमप

ग्रामपंचायत रिधोरा

सामान्य माहिती

रिधोरा ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील एक महत्त्वाची ग्रामपंचायत आहे. हे गाव काटोल शहरापासून 06 कि.मी. अंतरावर असून, नागपूर जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 60 कि.मी. अंतरावर स्थित आहे. रिधोरा गावाचा पिन कोड 441302 असून, या भागासाठी टपाल सेवा रिधोरा पोस्ट ऑफिस (Branch Office) किंवा जवळील ग्रामीण डाकघरामार्फत उपलब्ध आहे. हे गाव काटोल–नागपूर मार्गाशी जोडलेले असल्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने सोयीचे आहे. रिधोरा गावातील प्रमुख व्यवसाय शेती असून, शेतकरी विविध पिकांचे उत्पादन घेतात. यामध्ये कापूस, सोयाबीन, ज्वारी, तूर तसेच मोसंबी आणि संत्री, भाजीपाला पिके यांचा समावेश आहे. शेतीपूरक व्यवसायांमुळे गावाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते. रिधोरा गावचे ग्रामदैवत श्री तुळजाभवानी मंदिर-दत्त मंदिर हे प्राचीन मंदिर असून, गावात धार्मिक व सांस्कृतिक सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. ग्रामपंचायतीमार्फत विविध विकासात्मक योजना व उपक्रम राबवून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जात आहेत. रिधोरा हे गाव जाम नदीच्या काठावर वसलेले असुन येथे रिधोरा जाम नदी प्रकल्प (रिधोरा डँम्प) प्रेक्षणीय स्थळ आहे.

कामगिरी

रिधोरा गाव हे स्वच्छता, हरितीकरण आणि नीटनेटकेपणासाठी ओळखले जाते. ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने नियमित स्वच्छता मोहिमा राबवण्यात येतात, ज्यामुळे गावात स्वच्छ व निरोगी वातावरण कायम राखले जाते. गावातील नागरिकांसाठी RO प्लांटद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच जल जीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणावर निधीची योजना प्रगतीपथावर असून, प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू आहे. गावातील सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रामपंचायत मार्फत गावात विविध ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच जिल्हा परिषद शाळांमध्येही CCTV बसवण्यात आले असून, शालेय परिसर अधिक सुरक्षित करण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून RO प्लांट बसवण्यात आला आहे. तसेच गावातील शासकीय शाळांबद्दल विद्यार्थ्यांची व पालकांची आवड वाढावी यासाठी जिल्हा परिषद शाळेचा ‘मॉडेल स्कूल’ मध्ये समावेश करण्यात आला आहे. या माध्यमातून शाळेत भव्य खेळाचे मैदान (ग्राउंड), प्रयोगशाळा (लॅब), RCC वर्गखोल्या तसेच आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सर्व उपक्रमांमुळे रिधोरा गावाचा शैक्षणिक व सामाजिक विकास वेगाने होत आहे.

सेवा व सुविधा

मालमत्ता कर, पाणीपट्टी ऑनलाइन भरणा, शिक्षण समिती, स्वच्छता व आरोग्य सेवा, ग्राम पोर्टलवर संपर्क व माहिती. सेवा ग्रामपंचायत दाखले CSC दाखले ऑनलाईन विविध योजना ची माहिती

ग्रामविकास योजना

रिधोरा गावात ग्रामपंचायत कडून पुरवले जाणारे रस्ते गटार लाईट हायमास्ट विविध उपक्रम महिला साठी प्रशिक्षण डोळे तपासणी शिबिर इ

गावाची माहिती

ग्रामपंचायत

रिधोरा

ग्रामपंचायत स्थापना

1962

क्षेत्रफळ

2074.74 हेक्टर

तालुका

काटोल

जिल्हा

नागपूर

राज्य

महाराष्ट्र

लोकसंख्या (२०११)

4314

पुरुष

2205

स्त्री

2109

कुटुंब संख्या

900

मतदारांची संख्या

3879

लागवडी योग्य क्षेत्र

1549.24हेक्टर

बागायत क्षेत्र

675.05 हेक्टर

अंगणवाडी

05

जिल्हा शाळा

02

पोस्ट ऑफिस

01

तलाठी ऑफिस

01

आरोग्य उपकेंद्र

01

स्ट्रीट पोल

315

नळ कनेक्शन

900

सर्वजानिक विहिर

05

सर्वजानिक बोअर

02

महिला बचत गट

28

प्रधानमंत्री घरकुल

-

गावाचा नकाशा

योजना

नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आमच्या गावात राबवल्या जात आहेत. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

प्रधानमंत्री आवास योजना

गरीब कुटुंबांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत

₹1,20,000 ते ₹2,50,000 मदत

महात्मा गांधी रोजगार योजना

ग्रामीण भागातील नागरिकांसाठी रोजगाराची हमी

100 दिवस रोजगाराची हमी

स्वच्छ भारत अभियान

शौचालय बांधणीसाठी आर्थिक मदत

₹12,000 मदत

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

शेतीसाठी सौर ऊर्जा पंप उपलब्ध करणे

90% अनुदान

विविध दाखले मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश- २०१५ नुसार ऑनलाईन पद्धतीने जन्म नोंद/ मृत्यू नोंद/ विवाह नोंदणी दाखला/ दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला/ ग्रामपंचायत येणे बाकी दाखला/ ८ अ उतारा/ निराधार असल्याचा दाखला मागणी करण्यासाठी खालील फॉर्म भरुन पाठवा.


आमच्या सेवा

नागरिकांच्या सुविधेसाठी आमच्याकडे विविध सेवा उपलब्ध आहेत. सर्व सेवा पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने प्रदान केल्या जातात.

जन्म-मृत्यू प्रमाणपत्र

पायाभूत सुविधा

जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्रांसाठी ऑनलाइन अर्ज आणि सत्यापन सेवा

गृहनिर्माण योजना

योजना

प्रधानमंत्री आवास योजना आणि इतर गृहनिर्माण योजनांसाठी अर्ज

आरोग्य सेवा

आरोग्य

प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण आणि आरोग्य तपासणी सुविधा

पाणी पुरवठा

पायाभूत सुविधा

स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पाणी कनेक्शन सेवा

वीज कनेक्शन

पायाभूत सुविधा

नवीन वीज कनेक्शन आणि वीज संबंधी तक्रारींचे निराकरण

शिक्षण सहाय्य

शिक्षण

शिष्यवृत्ती, मिड-डे मील आणि शैक्षणिक सुविधांची माहिती

सामाजिक सुरक्षा

कल्याण

वृद्धावस्था पेन्शन, अपंगत्व पेन्शन आणि इतर सामाजिक योजना

कर व परवाने

प्रशासन

मालमत्ता कर, व्यावसायिक परवाना आणि इतर कर संबंधी सेवा

ग्रामपंचायत माहिती

१४६९.४८ हेक्टर

ग्रामपंचायत क्षेत्रफळ

८.८ किमी

जि. प. ते अंतर

वार्ड संख्या

४४२१

कुटुंब संख्या

ग्रा.पं.कार्यालय

पत्ता

ग्रामपंचायत कार्यालय,रिधोरा
काटोल, नागपूर-441302 महाराष्ट्र.

फोन

+91 9970719359

ईमेल

gpridhora@rediffmail.com

कार्यालयीन वेळ

सोमवार - शुक्रवार : सकाळी ९:४५ ते सायं ६:१५ वा

Scroll to Top